Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10वी पास उमेदवारांना इंटेलिजन्स ब्युरो मध्ये नोकरीची संधी; 677 रिक्त पदांसाठी भरती सुरू.

10वी पास उमेदवारांना  इंटेलिजन्स ब्युरो मध्ये नोकरीची संधी; 677 रिक्त पदांसाठी भरती सुरू. 


इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत सध्या बंपर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे एकूण 677 रिक्त जागांवर भरती होणार असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत "सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचार" पदांच्या एकूण 677 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर येथील अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे. या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यंत वाचा.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण ६७७ जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भारती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई, नागपूर येथे होत आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख

अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.mha.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

- वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज https://www.mha.gov.in/en/notifications/vacancies या लिंकद्वारे सादर करा. (अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे.)
- अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करा इतर कोणताही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे.
- तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.
- या भरतीसाठी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. त्यासाठी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.