Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

2024 : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! यूपीएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, लगेच डाउनलोड करा

2024 : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! यूपीएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, लगेच डाउनलोड करा


यूपीएससी अंतर्गत निवड होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यूपीएससीने शैक्षणिक वर्ष २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करता येणार आहे.

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा २०२४ आणि आयएफएस परीक्षा २६ मे २०२४ रोजी असेल. या परीक्षेचे वेळापत्रक हे यूपीएसीच्या अधिकृत वेबसाइटवर चेक करु शकता. मिळालेल्या माहितीनुसार हे यूपीएससीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज  करण्याची शेवटची तारीख ही ५ मार्च आहे. सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४ मध्ये असेल. यूपीएससीची नागरी सेवा, भारतीय वन सेवा आणि NDA, NA पर्यंतच्या सर्व प्रमुख परीक्षांची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे.

1. परीक्षा कधी होणार आहे?

यूपीएससीची नागरी सेवा आणि भारतीय वन विभाग सेवांची पूर्व परीक्षा ही २६ मे २०२४ रोजी घेण्यात येईल. तर नागरी सेवा मुख्य परीक्षा २० सप्टेंबर २०२४ पासून आणि IFS मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.

यूपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २१ जून २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. तर CISF असिस्टंट कमांडंट EXE LDCE 2024 १० मार्च २०२४ रोजी असेल. 18 फेब्रुवारी 2024 रोजी एकत्रित भू-शास्त्रज्ञ परीक्षा घेतली जाईल.

1. वेळापत्रक डाउनलोड कसे कराल?

परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला (Website) भेट द्यावी लागेल.

होम पेजच्या उजव्या बाजूला Examination नावाच्या टॅबवर क्लिक करा

ड्रॉप डाउन मेनूमधून वेळापत्रकवर क्लिक करा

त्यानंतर UPSC 2024 च्या परीक्षा वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा

यानंतर नवीन पेज ओपन होईल, वेळापत्रक पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.