Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नैनितालमध्ये स्कूलबस दरीत कोसळून सात ठार

नैनितालमध्ये स्कूलबस दरीत कोसळून सात ठार


डेहराडून : एक शालेय बस रविवारी रात्री १०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात सातजण ठार झाले, तर २४ जण जखमी झाले. सर्व जखमींना हल्द्वानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये पाच महिला कर्मचारी आणि एका मुलाचा समावेश आहे.


कालधुंगी रोडवरील नालनीजवळ रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हरयाणाच्या हिसारमधील एका शाळेतील ३४ जण शनिवारी नैनितालला आले होते. रविवारी परतताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. पोलिस, एसडीआरएफने बचावकार्य केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.