इथ डास मारणे पाप, डेंग्यू, मलेरिया झाला तरी मारू देत नाहीत लोक, पण का ? ...
मुंबई, 13 : कोणत्याही जीवाला किंवा सजिवाला मारणे हे पाप मानले जाते. पण असं असलं तरी देखील अन्नसाखळीमुळे काही गोष्टी यासाठी अपवाद असल्याचं मानलं जातं. शिवाय कधी कधी परिस्थिती अशी येते, मग त्यांना मारण्याशिवाय पर्याय उतर नाही.
यामध्ये मुंग्या, उंदीर, माशा, डास यांचा समावेश आहे. घरात डास जास्त झाले की लोक लिक्विड लावून, कधी इलेक्ट्रिक बॅट घेऊन तर कधी हाताने त्यांना मारतात. कारण यामुळे खाज आणि दाद उठण्याचा त्रास तर होतोच, शिवाय यामुळे मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार देखील उद्भवतात. ज्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो
लोक मनपा आणि सरकारला शिव्या देत राहतात की डास मारण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. पण तुम्हाला माहित आहे का की जगात एक असा देश आहे जिथे डास मारणे पाप मानले जाते. अधिकारी औषध फवारणीसाठी आले तरी लोक त्यांना थांवतात आणि त्यांचा राग करतात. काही महिन्यांपूर्वी येथे मलेरिया पसरला होता, तरीही लोकांनी डासांना मारू दिले नाही.
आता असं म्हटल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच असा प्रश्न उपस्थीत राहिला असेल की असं का? आणि हे कोणत्या देशात आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. आम्ही भूतानबद्दल बोलत आहोत. बौद्ध देश असल्याने भूतानमध्ये कोणत्याही सजीवाची हत्या करणे पाप मानले जाते. भलेही तो रोगजंतू निर्माण करणारा असेल तरीही. अशा स्थितीत मलेरिया रोखण्यासाठी औषध फवारणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आजही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.सरकारी कर्मचारी जेव्हा औषध शिंपडायला जातात तेव्हा लोक गोंधळ घालतात. काही वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती की, घरांमध्ये बळजबरीने औषध फवारणी केली जात होती. लोक म्हणतात की डासातही जीव आहे आणि त्याला मारता येत नाही. मात्र, आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. आता लोकांनी याला विरोध करणं कमी केलं आहे. हे त्यांच्या भल्यासाठी आहे असं समजून त्यांनी याला विरोध करणं कमी केलं आहे.
आता जाणून घ्या जगातील त्या देशाबद्दल जिथे एकही डास नाही. होय, एकही डास नाही. या देशाचे नाव आयलँड आहे, जो उत्तर अटलांटिक महासागरात आहे. केवळ डासच नाही, साप आणि इतर रांगणारे प्राणीही येथे आढळत नाहीत. कोळीच्या काही प्रजाती आढळतात, परंतु त्या मानवांसाठी धोकादायक नाहीत.
आणखी एक जागा आहे जिथे डास आढळत नाहीत, ते म्हणजे अंटार्क्टिका. अंटार्क्टिकामध्ये खूप थंडी असल्याने तेथे डास नसतात. आइसलँडमध्येही खूप कमी तापमान आहे, जे -38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
.jpeg)