Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता ब्राम्हण समाजही उतरला रस्त्यावर!

आता ब्राम्हण समाजही उतरला रस्त्यावर!


छत्रपती संभाजीनगर येथे आज (10 ऑक्टोबर) ब्राह्मण संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील वंदे मातरम् हॉलपासून निघालेला हा मोर्चा दिल्ली गेटजवळ असलेल्या विभागीय आयुक्त कार्यलयावर धडकणार आहे. ब्रह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, तसेच समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण मोफत करावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला आहे.

दरम्यान, या मोर्च्याच्या निमित्ताने सर्वचं ब्राह्मण संघटना एकत्रित आल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ब्राम्हण समाजाकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

तर महिलांची देखील लक्षणीय उपस्थितीती दिसत आहे. ब्रह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी ही प्रमुख मागणी यावेळी ब्राम्हण समाजाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. काही वेळातचं हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहचणार आहे. त्यानंतर आपल्या मागण्याचे निवेदन ब्राम्हण समाजाकडून विभागीय आयुक्त कार्यालयात दिला जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.