Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जागतिक दृष्टी दिनानिमित्त आयोजित उपक्रमाचा लाभ घ्या- ‍जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

जागतिक दृष्टी दिनानिमित्त आयोजित उपक्रमाचा लाभ घ्या- ‍जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम


सांगली, दि. 11,  :  जागतिक दृष्टी दिनानिमित्ति दि. 12 ऑक्टोबर रोजी डॉ. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयाच्या नेत्र विभागात तसेच राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अशासकीय स्वयंसेवी संस्था येथे मोतिबिंदू, खुपऱ्या, डायबेटीक रेटीनोपॅथी, लहान मुलांमधील नेत्रविकारांचा प्रतिबंध व व्यवस्थापन करणे याबाबतची तपासणी व उपचार मोफत करण्यात येत आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‍जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व नेत्ररोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शरद शेगांवकर यांनी केले आहे.

चालूवर्षी जागतिक दृष्टी दिनाचे घोषवाक्य "प्रेमाने घेऊया आपल्या डोळ्यांची काळजी व निगा " असे आहे. सांगली जिल्ह्यातील विविध उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विविध नेत्ररोग आजारांची तपासणी नेत्र चिकित्सा अधिकारी करणार आहेत. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नेत्र तपासणी झालेल्या रूग्णांना पुढील उपचारासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे संदर्भित करावे. त्याचबरोबर नेत्र आजार असलेल्या जास्तीत जास्त लहान मुलांचा शोध घेवून संदर्भित संस्थामध्ये समन्वय निर्माण करून लहान मुलांचे नेत्रविकार आजाराचे उपचार करण्यात यावेत. अंध व्यक्ती व मुलांना सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना डॉ. कदम यांनी दिल्या आहेत.  जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे यांनी केले आहे.   


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.