Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे मराठा विद्यार्थ्याने केली आत्महत्या

धक्कादायक! फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे मराठा विद्यार्थ्याने केली आत्महत्या


संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच परभणी जिल्हयातील जिंतुर तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील एका मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने शैक्षणिक फी भरू न शकल्यामुळे आत्महत्या केली आहे.

परमेश्वर चितरे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता अकरावीत शिकत होता. परमेश्वरच्या कुटुंबाकडे त्याची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे परमेश्वरने विष प्राशन करत स्वत:चं आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे संपुर्ण परभणी जिल्हयात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणासाठी सुनील कावळे या व्यक्तीने आत्महत्या करून आपले आयुष्य संपून घेतले. ही घटना ताजी असतानाच आता एका मराठा विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. शालेय फी भरण्यासाठी कुटुंबाकडे पैसे नसल्यामुळे आणि महाविद्यालयाकडून सतत फिची विचारणा करण्यात येत असल्यामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ज्यामुळे आता पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परभणीच्या जिंतुर तालुक्यातील दौडगाव राहणाऱ्या विठ्ठल चितरे यांचा 17 वर्षीय परमेश्वर चितरे मुलगा संभाजीनगर येथे अकरावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. परमेश्वरची महाविद्यालयाची फी भरायची राहिली होती. त्यामुळे तो फी कधी भरेल असा प्रश्न सतत महाविद्यालयाकडून विचारला जात आहे. परमेश्वरने ही बाब घरी देखील सांगितली होती. त्यावेळी "सोयाबीनची काढणी झाल्यानंतर फिस भरू" असे आश्वासन परमेश्वरला त्याच्या वडिलांनी दिले होते. ज्यामुळे फी भरण्यास उशीर झाला. शेवटी या सर्व गोष्टींना वैतागून शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास परमेश्वरने विष प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या सर्व घटनेवर प्रतिक्रिया देताना परमेश्वराच्या वडिलांनी म्हणले आहे की, "मी एक शेत मजूर आहे. त्यामुळे मला लगेच महाविद्यालयाची फी भरणे शक्य झाले नाही. परंतु आपल्याला आरक्षण असते तर एवढे पैसे भरावे लागले नसते" सध्या या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.