Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किराणा दुकानातील गल्ल्यावर डल्ला मारणाऱ्या सराईतास अटक सांगली एलसीबीची कारवाई

किराणा दुकानातील गल्ल्यावर डल्ला मारणाऱ्या सराईतास अटक सांगली एलसीबीची कारवाई

सांगली :  कवठेमहांकाळ येथील एका किराणा दुकानातील गल्ल्यावर डल्ला मारणाऱ्या कर्नाटक येथील सराईत आंतरराज्य गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक दुचाकी, रोकड असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

इम्रानअली यावरअली बेग (वय २७, रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कवठेमहांकाळ येथील अनिल सगरे यांच्या दुकानातून दि. २७ जानेवारी रोजी एकाने सगरे यांची नजर चुकवून गल्ल्यातील रोकड लंपास केली होती. याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयिताला पकडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. 

पथकाला सगरे यांच्या दुकानात चोरी केलेला संशयित सांगली-आष्टा रस्त्यावरील एका बंद पडलेल्या टोल नाक्यावर थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ ३४ हजारांची रोकड सापडली. त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने ती कवठेमहांकाळ येथील दुकानातून चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडील दुचाकी, रोकड जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, अरूण पाटील, कुबेर खोत, सागर लवटे, अभिजित ठाणेकर, कॅप्टन गुंडवाडे, श्रीधर बागडी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.