Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंधश्रद्धेचा कहर! तान्ह्या बाळाला सर्दी झाली म्हणून दिले गरम सळईचे चटके

अंधश्रद्धेचा कहर! तान्ह्या बाळाला सर्दी झाली म्हणून दिले गरम सळईचे चटके 


लहान मुलांना किंवा तान्ह्या बाळांना सर्दी पडसे होणे ही तशी सामान्य बाब आहे. पण, सर्दी झाली म्हणून एका महिन्याच्या बाळाला मांत्रिकाने गरम सळीचे चटके दिले आहेत. ही संतापजनक घटना राजस्थानच्या भीलवाडा येथे घडली आहे. या अघोरी प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली आहे.

भीलवाडा जिल्ह्यातील फूलिया कला येथे पनोतिया गावात ही भयंकर घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या रामदास आणि सोनिया यांना एका महिन्यापूर्वी मुलगी झाली. दरम्यान, महिन्याभरात वातावरण बदलल्याने मुलीला सर्दी झाली. पण तिला डॉक्टरकडे नेण्याऐवजी एका तांत्रिकाकडे नेण्यात आलं. त्याने काहीतरी मंत्र म्हटल्याचं दाखवत गरम सळीने मुलीच्या पाठ, पोट आणि अन्य ठिकाणी चटके दिले. त्यानंतर ही मुलगी पूर्ववत होईल, असं सांगून बाळाला घरी न्यायला सांगितलं.

चटक्यांमुळे बाळाने टाहो फोडला. वेदनेने कळवळून रात्रभर रडल्याने ती बेशुद्ध पडली. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली. तिला भीलवाडा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप मुलीला शुद्ध न आल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.