Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवजात बाळाची मुस्लिम नगरसेवकाला विक्री केल्याप्रकरणी 2 डॉक्टरांना अटक

नवजात बाळाची मुस्लिम नगरसेवकाला विक्री केल्याप्रकरणी 2 डॉक्टरांना अटक

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खासगी रुग्णालयातील दोन डॉक्टरांना एका हिंदू दाम्पत्याचे नवजात बाळ मुस्लिम नगरसेवकाच्या कुटुंबाला विकल्याप्रकरणी अटक करण्यात आले आहे. या घटनेनंतर शहारत मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. डॉक्टरांनी बाळ मृत जन्माला आल्याचे कुटुंबियाला सांगितले. त्यानंतर ही घटना एका आठवड्यानंतर उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोंबर रोजी पुष्पा देवी अस नाव असलेल्या महिलेची दोन डॉक्टरांनी सिझेरियन शस्त्रक्रिया केली. डॉक्टर अक्रम आणि डॉक्टर रहमान यांनी तिची शस्त्रक्रिया केली. ऑपरेशननंतर महिला एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहिली दरम्यान तिला डॉक्टरांनी मृत बाळाला जन्म दिल्याची माहिती दिली. पण नंतर तिला कळाले की दोन डॉक्टरांनी तिचे बाळ विकले आहे. हे ऐकून कुटुंबियांना धक्काच बसला.  अनेकदा विनंती करूनही डॉक्टरांनी बाळाला दिले नाही. या घटनेची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना देण्यात आली.


पोलिसांनी डॉ. अक्रमची चौकशी केली, ज्याने गुन्ह्याची कबुली दिली. डॉक्टर अक्रम यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सिद्धार्थनगर येथील नगरसेवक असलेला निसारच्या घरावर छापा टाकून बाळाला ताब्यात घेतले. निसार फरार असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली. पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेऊन अटक केले आहे. डॉक्टरांनी या आधी कोणते मुल विकले आहेत का याचा तपास सुरु केला आहे.


बलरामपूरच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपूर्ण घटनेचा अहवाल पाठवण्यास सांगितले असून, नोंदणी योग्य न आढळल्यास रुग्णालय सील करण्याची पुढील कारवाई करण्यात येईल. डॉक्टरांनी बाळ नासीरकडे का सोपवले हे अद्याप कळू शकलेले नाही. आतापर्यंत कोणताही आर्थिक व्यवहार आढळून आलेला नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.