असं असेल तर अमिताभ बच्चन यांनी वर्ल्ड कपची फायनल पाहूच नये?
वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्येझालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा दारुन पराभव केला आहे. सध्या संपूर्ण भारतात भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंचं कौतुक सुरु आहे.
सेमी फायनलमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केल्यामुळे सर्वच स्तरातून भारतीय क्रिकेटपटूंचं कौतुक होत आहे. फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटपटूंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांच्या ट्विटनंतर मात्र अनेकांना धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा दारुन पराभव केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. एक्सवर बिग बी म्हणाले, 'मी जेव्हा सामना पाहात नाही, तेव्हा आपण जिंकतो!' अमिताभ बच्चन यांच्या एक्सवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिला आहे.
एक नेटकरी म्हणाला, 'यंदाचा सामनावीर तुम्हालाच मिळल सर…', दुसरा नेटकरी म्हणाला, 'सर तुम्ही सामना पाहिला नाहीत बरं झालं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'फक्त एक गोष्ट म्हणजे आपण जिंकले पाहिजे आणि आपण नेहमीच जिंकतो…' सध्या सर्वत्र फक्त वर्ल्ड कप आणि अमिताभ बच्चन यांच्या एक्सची चर्चा रंगत आहे.एवंढच नाही तर, अमिताभ बच्चन यांना सामना पाहिला नाही तर, आपण जिंकत असू तर, त्यांनी वर्ल्ड कपची फायनल पाहूच नये? अशी देखील चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त करत असतात.
सांगायचं झालं तर, भारत आणि न्यझीलंडमध्ये झालेल्या सेमी फायनल सामना पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी वानखेडे स्टेडीयमवर पोहोचले होते. किआरा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहीद कपूर, मीरा राजपूत, विकी कौशल, रणबीर कपूर, जॉन अब्राहम, कुणाल खेमू, सोहा अली खान, अनुष्का शर्मा.. यांसारखे कलाकार सेमा फायनल पाहाण्यासाठी पोहोचले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.