🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा तरुणांनी काळे झेंडे दाखवताच आमदार संतोष बांगर पळाले!

मराठा तरुणांनी काळे झेंडे दाखवताच  आमदार संतोष बांगर पळाले!


कीर्तनाच्या कार्यक्रमाला आलेले  आमदार संतोष बांगर हे मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी काळे झेंडे दाखवताच पळाले! यावेळी मराठा तरुणांनी 'एक मराठा- लाख मराठा' अशा जोरदार घोषणा दिल्या.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय मराठा आंदोलकांनी घेतला आहे. गावात कोणताही राजकीय कार्यक्रम घेण्यासही मराठा आंदोलकांचा विरोध आहे. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनाला हजर राहण्यासाठी द्आमदार संतोष बांगर आले. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे पाहताच पोलीस संरक्षणात आमदार बांगर यांनी तेथून पळ काढला. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.