Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बड्या व्यावसायिकाच्या घरात सुनेचा हुंड्यासाठी छळ, चेन्नईच्या कुटुंबावर पुण्यात गुन्हा दाखल

बड्या व्यावसायिकाच्या घरात सुनेचा हुंड्यासाठी छळ, चेन्नईच्या कुटुंबावर पुण्यात गुन्हा दाखल


पुणे: चेन्नई येथील मोठ्या व्यावसायिकाने सुनेचा पाच कोटी रुपयांच्या हुंड्यासाठी छळ करुन मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात  सासरच्या लोकांवर कौटुंबिक हिंसाचार  व विनयभंगाचा  गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला अंघोळीला गेल्यानंतर तिच्या दिराने वाईट नजरेने पाहून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरुन येरवडा पोलिसांनी  चेन्नई येथील 31 वर्षीय पती, सासरे, सासू आणि दिर यांच्यावर आयपीसी 498(अ), 323, 354, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 3 डिसेंबर 2014 ते आज पर्य़ंत महिलेच्या चेन्नई येथील सासरी घडला आहे. याबाबत कल्याणीनगर येथे राहणाऱ्या 29 वर्षाच्या महिलेने येरवडा पोलिसांत सोमवारी (दि.13) तक्रार दिली आहे. संबंधित महिला पुण्यातील एका बड्या उद्योजकाची मुलगी असल्याचे सांगितले जात आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिलेच्या सासरच्या व्यक्तींचा चेन्नईत मोठा व्यवसाय आहे. तर फिर्यादी महिलेच्या वडिलांचा देखील पुण्यात मोठा व्यवसाय आहे. 3 डिसेंबर 2014 रोजी महिलेचे चेन्नई येथील तरुणासोबत लग्न झाले होते. 

लग्नानंतर आरोपींनी महिलेचा लग्नात हुंडा जास्त दिला नाही, म्हणून छळ करण्यास सुरुवात केली.  माहेरावरुन पाच कोटी रुपये घेऊन येण्यासाठी फिर्यादी यांना वारंवार शिवीगाळ करुन मारहाण केली.  तसेच त्या चांगल्या दिसत नाही असे टोमणे मारुन मानसिक त्रास दिला. महिला बाथरूम मध्ये अंघोळीसाठी गेल्या असता  दिराने बेडरुमच्या काचेतून घाणेरड्या नजरेने पाहून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.  पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड  करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.