Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदी पुन्हा सत्तेत आल्यास मला जेलमध्ये टाकतील ;सत्यपाल मलिक

मोदी पुन्हा सत्तेत आल्यास मला जेलमध्ये टाकतील ;सत्यपाल मलिक


भाजपचा विरोधी नाही. गडकरी यांचाही विरोधी नाही. मी केवळ मोदी आणि त्यांच्या कार्याच्या विरोधात आहे, असे स्पष्ट करीत जर आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यास मला ते जेलमध्ये टाकतील, कारण मी मोदी यांचा नंबर एकचा शत्रू आहे, असे रोखठोक मत जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केले.

पिंकसिटी प्रेस क्लबमध्ये शुक्रवारी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला. विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करू नका, असे आवाहन मलिक यांनी यावेळी केले. आगामी निवडणुकीत आपले हित पाहून मतदारांनी मतदान कराव़े असे आवाहनही त्यांनी केले. पुलवामा प्रकरणी मलिक यांनी मोदींवर गंभीर आरोप केले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.