Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश जारी

दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश जारी


सांगली, दि. 9,  : दिपावली दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामुळे आग लागण्याची किंवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा विचार करून सार्वजनिक आरोग्य व हिताच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर दि. 10 ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीकरीता पुढील प्रमाणे मनाई आदेश पारित केले आहेत.

आदेशात म्हटले आहे, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शांतता, सुव्यवस्था राखण्याकरीता पेट्रोल / डीझेल पंप / डेपो, गॅस सिलेंडर गोडाऊन, केरोसीन तेलाचे डेपो, फटाक्यांची दुकाने, ज्वालाग्रही पदार्थांचे डेपो, रासायनिक पदार्थांचे डेपो या ठिकाणापासून 100 मीटर आत फटाके उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज, रूग्णालये, न्यायालये इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जे शांतता झोनमध्ये येतात त्या भागात 100 मीटर परिसरात फटाके फोडण्यस मनाई करण्यात आली आहे. फटाक्याच्या लडी व असे फटाके जे मोठ्या प्रमाणात प्रदुषीत हवा, आवाज, घनकचरा तयार करतात अशा प्रकारच्या तत्सम फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उडणारे दिवे / कंदील (FLYING LANTERNS) आदी उडविण्यास मनाई करण्यात आली आहे.  हा आदेश दि. 10 नोव्हेंबर 2023 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 15 नोव्हेंबर 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.