Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसाने स्वतावर गोळी झाडून केली आत्महत्या

पोलिसाने स्वतावर गोळी झाडून केली आत्महत्या

सोलापूर :  सोलापूरमध्ये पोलीस शिपायाने स्वतावर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज बुधवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस शिपाई राहुल अरुण शिरसट (वय ४०, रा. ब्लॉक नंबर २५ केशवनगर पोलीस वसाहत पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे सोलापूर) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलीस शिपाई शिरसाट हे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीसाठी होते. आज बुधवार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ड्युटीवरून उतरल्यानंतर घरी जाऊन त्यांनी त्यांच्या एसएलआर बंदुकीतून स्वतःवर गोळी मारून घेतली. ही घटना समजतात वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान शिरसाट यांच्या जीवन संपवण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.