Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधानांचं भाषण सुरु असताना तरुणीनं उचललं मोठं पाऊल; व्हिडिओ पहा

पंतप्रधानांचं भाषण सुरु असताना तरुणीनं उचललं मोठं पाऊल; व्हिडिओ पहा

नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणमधील सिकंदरबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी आले होते. यावेळी एक हैराण करणारं प्रकरणं पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करत होते. यावेळी अचानक एक मुलगी लाईटिंगसाठी उभारण्यात आलेल्या एका पोलवर चढली. त्यामुळे खळबळ उडाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने त्यांनी तात्काळ याची दखल घेतली. मोदींनी या मुलीला खाली उतरण्याची विनंती केली. पण, मुलगी खाली उतरण्यास तयार नव्हती. तिला काहीतरी सांगायचं होतं. पंतप्रधान मोदी यावेळी मुलीला म्हणाले की, मी तुमच्यासाठी इथं आलो आहे. मी तुझं काय म्हणणं आहे ते ऐकूण घेईन. पण, बेटा, तू खाली उतर.


पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य काही नेत्यांनीही मुलीला खाली उतरण्याची विनंती केली. पोलिस देखील सतर्क झाले होते. सर्वांकडून विनंती होत असल्याने आणि पंतप्रधान मोदी यांनी तिचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी दाखवल्यानंतर मुलगी पोलवरुन खाली उतरली. मुलगी खाली उतरल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तिचे आभार मानले. दरम्यान, या प्रकारामुळे थोडावेळासाठी सभेमध्ये तणाव निर्माण झाला होता.

सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, तेलंगणमध्ये ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोर लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपनेही राज्यात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.