Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एल्विश यादव प्रकरणाचा वैदकीय अहवाल; धक्कादायक माहिती समोर

एल्विश यादव प्रकरणाचा वैदकीय अहवाल; धक्कादायक माहिती समोर

एल्विश यादव हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल झाला होता. नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान त्याच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेव पार्टी, सापाचं विष, परदेशी मुलींचा 'सप्लाय' केल्याने एल्विश यादव चर्चेत आहे. आता या प्रकरणाचा वैदकीय अहवाल समोर आला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एल्विश यादव प्रकरणाचा वैदकीय अहवाल समोर

एल्विश यादव प्रकरणाचा वैदकीय अहवाल समोर आला आहे. वनविभागातर्फे सापांची वैद्यकीय तपासनी करण्यात आली आहे. या तपासात पाच कोबरा विषारी असल्याचे तर चार साप विषारी नसल्याचं उघड झालं आहे. डेप्युटी सीव्हीओच्या पॅनेलतर्फे वैद्यकीय प्रशिक्षण करण्यात आलं आहे. विषारी सापाची विक्री करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. यामुळे गुन्हेगाराला सात वर्षापर्यंतची शिक्षा भोगावी लागते. आता न्यायालयाच्या परवानगीनंतर सापांना जंगलात सोडण्यात आले आहे.

'बिग बॉस' विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल

बिग बॉस विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा एल्विशवर आरोप आहे. एल्विशसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषारी सापांच्या तस्करीचे एल्विशवर आरोप आहेत. पण या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं एल्विश म्हणाला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांना सहकार्य करण्यास तो तयार आहे.

'बिग बॉस' फेम एल्विश यादव अडचणीत

'बिग बॉस ओटीटी'चा विजेता एल्विश यादव अडचणीत आला आहे. प्रसिद्धीझोतात आलेल्या युट्यूबर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेव पार्टीत विषारी सापांचं विष पुरवणं, परदेशी मुलींचा 'सप्लाय' करणं असे अनेक आरोप एल्विशवर लावण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मेनका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो. विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. परदेशी मुलींचा 'सप्लाय' करतो. त्यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशवर गुन्हा दाखल केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.