🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्योगपती जिंदाल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

उद्योगपती जिंदाल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

जेएसडब्ल्यू स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्या विरोधात वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा पोलिसांनी दाखल केल्याचे सांगण्यात येते.


जुहू येथील रहिवासी असलेल्या एका 30 वर्षीय डॉक्टर महिलेच्या आरोपानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या डॉक्टर महिलेने त्यांचे जिंदाल यांनी शारीरिक शोषण केल्याचा तक्रार अर्ज पोलिसात दाखल केला होता. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात गेले. अखेर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी जिंदाल यांच्या विरोधात त्या डॉक्टर महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.