Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, एकजण ताब्यात

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, एकजण ताब्यात

मुंबई पोलिसांच्या  कंट्रोल रुममध्ये येणारे धमक्यांचे फोन काही थांबण्याचं नाव घेईनात. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमचा  फोन पुन्हा एकदा खणाणला. पण यावेळी धमकी मुंबई उडवण्याची किंवा मुंबईत घातपात करण्याची नाहीतर, टाटा समूहाचे  माजी अध्यक्ष रतन टाटा  यांना देण्यात आली. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा ते देखील सायरस मिस्त्री होतील, असं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं फोनवर म्हटलं. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र वेगानं हलवत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या.


मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमचा फोन खणाणला. हा फोन टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबाबत होता. रतन टाटांच्या नावाने धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला होता. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आलेल्या फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं रतन टाटा यांचं नाव घेऊन धमकी दिली. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा, अन्यथा ते सायरस मिस्त्री होतील, असं फोन करणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं. फोन आल्यानंतर पोलीस कंट्रोल रूममध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रं वेगानं फिरवली आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोध घेतला. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या, त्याच्या चौकशीत सदर व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे.

धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस पूर्ण अलर्ट मोडमध्ये आले. तात्काळ तपासाची सूत्रं हलवण्यात आली. एका पथकाला रतन टाटा यांच्या सुरक्षेती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर दुसऱ्या पथकाला धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.


नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कॉलरचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीनं आणि टेलिकॉम कंपनीच्या मदतीनं कॉलरचा शोध घेतला असता, त्याचं लोकेशन कर्नाटक असल्याचं समजलं. त्यानंतर धमकी देणाऱ्याचा पत्ता शोधला असता फोन करणारा पुण्याचा रहिवासी असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ पुण्यातील (Pune News) घरी धडक दिली. त्यावेळी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. धमकीचा फोन करणारी व्यक्ती गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असल्याची बाब समोर आली. तसेच, सदर व्यक्तीच्या पत्नीनं यासंदर्भातील तक्रार पोलिसांत केल्याचंही समोर आलं.

चौकशीदरम्यान, कॉलरला स्किझोफ्रेनियाचा त्रास होता आणि त्यानं कोणालाही न सांगता घरून फोन घेतला आणि त्याच फोनवरून त्यानं मुंबई पोलिसांच्या कंट्रोल नंबरवर फोन केला आणि रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक आजारी आहे, त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. त्यानं फायनान्समध्ये एमबीए केलं असून अभियांत्रिकीचंही शिक्षण घेतलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.