🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्फोंसा शाळेच्या खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अल्फोंसा शाळेच्या खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे द्वारा आयोजित १७ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये, १२० किलो गटांमध्ये, मिरजेच्या अल्फोंसा शाळेमध्ये शिकणाऱ्या दर्शन नित्यानंद दोडमणी यांने सुवर्णपदक पटकावले, तो इ. १० वी मध्ये शिकत असून त्याने ठाणे येथे दि. ८/१२/२०२३ रोजी झालेल्या स्पर्धेत पुणे व मुंबईच्या खेळाडूंचा पराभव करून हे यश संपादन केले. या स्पर्धेत सांगली जिल्हा व कोल्हापूर विभागातून त्याने प्रतिनिधित्व केले होते, या त्याच्या यशामुळे, त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून शाळेचे मॅनेजर फादर शाजी जोसेफ, मुख्याध्यापक फादर लिजो जोस, उपमुख्याध्यापक फादर लिओ मायकल, क्रीडा शिक्षक राजू जाधव, शाळेचे सुपरवायझर जस्टिन झेवियर, वर्गशिक्षक विजय धुमाळ तसेच शिक्षक व पालक यांचे मार्गदर्शन लाभले, त्याच्या या यशामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.