Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बिहारमध्ये पुलाखाली अडकलं विमानबिहारमधील मोतिहारीमध्ये पिप्रकोठी ओव्हर ब्रिजवर विमान अडकल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती. लोकांना बराच काळ समस्यांना सामोरे जावे लागले. या सगळ्या दरम्यान काही लोक विमानासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त दिसले.
विमानाचा बंद पडलेला प्रतिकृती (सांगाडा) ट्रकने मुंबईहून आसामला नेत असताना मोतीहारीच्या पिप्रकोठी पुलाखाली अडकला. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. ट्रक चालक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने विमानाचा सांगाडा बाहेर काढण्यात आला. 

दरम्यान, विमान पुलाखाली अडकल्याची बातमी समजताच अनेक लोकांनी ते पाहण्यासाठी धाव घेतली. काही लोक सेल्फी घेतानाही दिसले. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी पुलाखाली अडकलेल्या विमानाचा सांगाडा बाहेर काढला. यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हैदराबादमध्ये अशीच एक घटना घडली होती

गेल्या वर्षी हैदराबादमध्येही अशीच घटना घडली होती. नोव्हेंबरमध्ये, हैदराबादमधील पिस्ता हाऊसच्या मालकाने खरेदी केलेले जुने विमान कोचीहून हैदराबादला ट्रकच्या ट्रेलरवर नेत असताना अंडरपासमध्ये अडकले. अंडरपासखाली अडकलेल्या विमानाचे दर्शन घेण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.