Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारुड्याच्या बाटलीने थांबला मंत्री शंभूराज देसाई यांचा ताफा

दारुड्याच्या बाटलीने थांबला मंत्री शंभूराज देसाई यांचा ताफा


सातारा :  राज्याच्या मंत्र्यांचा ताफा म्हटले की, त्यासाठी सर्व बाजूंची वाहतूक ही थांबवण्यात येते. परंतु, ग्रामीण भागात असे फारसे होताना दिसत नाही आणि ज्यामुळे मंत्र्यांच्या ताफ्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत घडली आहे. शंभूराज देसाई यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. 

देसाई यांच्या वाहनांचा ताफा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी जात असताना एक बाटली त्यांच्या वाहनावर येऊन पडली ज्यानंतर तत्काळ हा ताफा थांबविण्यात आला. या घटनेमुळे काही काळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता. परंतु, एका बेवड्याने एकाशी वाद घालताना ही बाटली भिरकावल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनांचा ताफा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी जात होता. यावेळी पोवई नाक्यावर त्यांच्या गाडीवर अचानक एक बाटली येऊन पडली. ज्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास केल्यानंतर ही घटना एकाने दारूच्या नशेत केल्याची माहिती समोर आली. पण जी बाटली डारुड्याकडून भिरकावण्यात आली. ती पाण्याची बाटली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. नम्या यंत्र्या भोसले (वय 45) असे दारुड्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुशांत कदम यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.