Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लष्कर भरतीचे कारण देऊन लातूरचा अमोल पोहचला दिल्लीत अन् संसदेत..

लष्कर भरतीचे कारण देऊन लातूरचा अमोल पोहचला दिल्लीत अन् संसदेत..


मुंबई: संसदेबाहेर निदर्शने आणि घोषणाबाजी केल्याबद्दल अटक झालेल्यांत अमोल शिंदे (वय २५) या महाराष्ट्रातील तरूणाचा समावेश आहे. लष्कर भरतीसाठी जात असल्याचे कारण सांगून तो दिल्लीत दाखल झाला. अमोल हा लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. 


त्याच्या विषयीची माहिती मिळाल्यानंतर लातूर पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहचले. अमोल लष्कर भरतीसाठी दिल्लीला जात असल्याचे सांगून ९ डिसेंबरला घरातून बाहेर पडला. तो याआधी अशाप्रकारच्या विविध भरतीप्रक्रियांमध्ये सहभागी झाला. त्यामुळे त्याच्या दिल्लीला जाण्यात आम्हाला कुठले वावगे वाटले नाही, असे त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले.


अमोल बीए ग्रॅज्युएट आहे. विविध भरतीप्रक्रियांमध्ये सहभागी होतानाच तो रोजंदारीची कामे करतो. त्याचे आई-वडील आणि दोन भाऊही उदरनिर्वाहासाठी तशाच प्रकारची कामे करतात. अमोलचा कुठल्या राजकीय पक्षाशी किंवा चळवळीशी संबंध नाही, असे पोलिसांनी नमूद केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.