Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगातील सर्वात धोकादायक झाड, माणसांना जवळ जाण्यास मनाई; काय आहे कारण?

जगातील सर्वात धोकादायक झाड, माणसांना जवळ जाण्यास मनाई; काय आहे कारण?

जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. प्रत्येक झाडामध्ये काहीतरी वेगळेपण असतं. काही झाडे त्यांच्या वैशिष्ठ्यांसाठी ओळखली जातात तर काही झाडे धोकादायक गोष्टींसाठी अशीही काही झाडे आहेत ज्यांपासून माणसांना, प्राण्यांनाही धोका आहे. अशाच एका झाडाविषयी जाणून घेऊया. ज्या झाडाला फळे नाहीतर 'ग्रेनेड' आहेत. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

झाड हे मानसाला ऑक्सिजन पुरवतात त्यामुळे त्यांना वरदान मानलं जातं मात्र आज अशा झाडाविषयी जाणून घेऊया जे वरदान नाही तर धोका आहे. ज्याला जगातील सर्वात धोकादायक झाडही म्हटलं जातं.

या झाडाचं नाव आहे 'सैंड बॉक्स ट्री'. या झाडाचे शास्त्रीय नाव हुरा क्रेपिटन्स आहे. याला पोसमवुड, मंकी नो क्लाइंब किंवा जाबिलो असंही म्हणतात. हे मुळात उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या उष्ण प्रदेशात आढळतं. याशिवाय हे झाड अॅमेझॉन रेन फॉरेस्टमध्येही आढळतं. या झाडाला ग्रेनेड असतात त्यामुळे याला धोकादायक म्हटलं जातं.

सैंडबॉक्स हे झाड 60 मीटर उंच वाढू शकते. त्याची पानं 60 मीटर लांब वाढू शकतात. या झाडाला दोन प्रकारची फुले येतात. यामध्ये एक मेल फ्लॉवर लांब काट्यांमध्ये उगवतं तर फिमेल फ्लॉवर लांब पानांमध्ये वाढते. या झाडाच्या खोडाला लांब आणि तीक्ष्ण काटे असतात. या झाडावर भोपळ्याच्या आकाराची फळे येतात जी ग्रेनेडसारखी फुटतात. हे तीन ते पाच सेंटीमीटर मोठी असतात. हे फळ फुटल्यावर त्याच्या बिया दूरवर पसरतात. पण त्याच्या बिया ज्या वेगाने पडतात त्यामुळे माणसाच्या शरीरात छिद्रही पडू शकते. यामुले झाड अतिशय धोकादायक मानलं जाते. लोकांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.