Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घटस्फोट दे, अन्यथा तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो; पत्नीला धमकावणाऱ्या पतीला अटक

घटस्फोट दे, अन्यथा तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो; पत्नीला धमकावणाऱ्या पतीला अटक


घटस्फोट दे, अन्यथा तुझे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो म्हणून पत्नीला धमकी देणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या धमकीला वैतागून पत्नीने थेट सायबर पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली. 

बेळगावातील रहिवासी असलेल्या किरण पाटील याने स्वतःच्या पत्नी सोबतचे खासगी क्षण व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. या खासगी क्षणाचा व्हिडीओचा वापर किरणने पत्नीला धमकावण्यासाठी केला. किरण याने पत्नीला व्हिडिओ दाखवून मला घटस्फोट दे नाही तर सोशल मीडियावर तुझे व्हिडिओ व्हायरल करतो म्हणून धमकवण्यास सुरुवात केली. किरण याला पत्नी आणि नातेवाईकांनी बऱ्याच तऱ्हेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण किरण घटस्फोट पाहिजे या मागणीवर ठाम होता.

अखेर पत्नीने सायबर पोलीस स्थानकात पती अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याची तक्रार केली. त्याची दखल घेऊन पोलिसांनी त्वरित कार्यवाही करून किरणला ताब्यात घेण्याची तयारी केली. किरण याला ताब्यात घेण्यास गेलेल्या पोलीस पथकाच्या समोर किरण याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तो प्रयत्न उधळून लावला. किरण याला अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.