Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार प्रणिती शिंदे अन् मला भाजपची ऑफर!

आमदार प्रणिती शिंदे अन् मला भाजपची ऑफर!


सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला दोनदा पराभव झाला, तरीदेखील मला आणि आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये या म्हणून ऑफर आल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला, 'आता मी ८३ वर्षात आहे, अशावेळी दुसऱ्याचे घर कसे उभा करणार म्हणत त्यांनी आपण पक्ष सोडणार नाही' असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सोलापुरातील एका हुर्डा पार्टीनिमित्त आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. शिंदे यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी भाजपकडून आपल्याला व मुलगी प्रणिती शिंदेंना ऑफर आल्याचे स्पष्ट केले. 'ज्या आईच्या कुशीत आमचे बालपण, तारूण्य गेले, अशावेळी आम्ही दुसरीकडे जाणे कसे शक्य आहे', असा सवालही त्यांनी यावेळी केला. आमदार प्रणिती शिंदे तर कधीही पक्ष बदलण्याचा विचार करणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, राजकारणात असे होत राहते, दिवंगत पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याही बाबतीत असे झाले होते. पण, त्यांनी पक्ष सोडला नाही. सध्या पक्षाला घोडेसे वाईट दिवस आहेत, पण यातूनही पक्ष निश्चितपणे उभारी घेईल. थोडा त्रास होतो, पण त्यातही संघर्ष करून उभा राहिल्यास निश्चितपणे पुन्हा यश मिळते असेही ते म्हणाले.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.