शिळे अन्न दिल्याचा वंदे भारत प्रवाशाचा आरोप, Video Viral
नवी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने प्रवासादरम्यान त्याला शिळे जेवण दिल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर जेवणाचे ट्रे परत घेण्याची विंनीती करत आहे. या प्रकरणी प्रवाशांने X वर व्हिडिओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये प्रवाशाने त्याची तक्रार लिहली आहे.
पोस्टमध्ये दोन व्हिडिओ देखली आहे. या पोस्टमध्ये त्याने रेल्वे विभागाला टॅग केले होते. त्यानंतर लगेच रेल्वे विभागाकडून उत्तर आले आहे. आकाश केशरी असं तक्रारदाराचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, मी NDLS ते BSB पर्यंत 22416 च्या प्रवासात आहे. आता जे अन्न दिले जात होते त्यातून दुर्गंदी येत आहे. ते अन्न खाण्या योग्य नाही, कृपया माझे सर्व पैसे परत करा. हे विक्रेते वंदे भारत एक्सप्रेसचे ब्रँड नाव खराब करत आहेत,” असंं त्याने पोस्टमध्ये लिहलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
