Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राम मंदिर उद्घाटन आणि प्रकाश राज यांच्या Videoची चर्चा

राम मंदिर उद्घाटन आणि प्रकाश राज यांच्या Videoची चर्चा

मुंबई : अयोध्येत झालेल्या राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सगळे मग्न झाले. संपूर्ण भारतात भगवा रंग पाहायला मिळतोय. अनेकांनी घराला विद्युत रोषणाई केली आहे. तर काहींनी फुलांनी घर सजवलं. अनेकांनी घरावर भगवे झेंडे फडकवले आहेत. अनेक ठिकाणी जय श्री रामच्या घोषणा देण्यात येत आहेत. लोक भजन-किर्तनात रमले आहेत. अशात साऊथ आणि बॉलिवूड सिनेमात आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची चर्चा होतेय.

प्रकाश राज यांनी शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. प्रकाश नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आले आहेत. आपली मतं ते स्पष्टरित्या मांडताना दिसतात. जय श्री रामच्या घोषणा देत आपल्या घरावर भगवा झेंडा लावणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ प्रकाश राज यांनी शेअर केला आहे.

प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की एक व्यक्ती उंचावर चढला आहे. ती इमारत ख्रिश्चन लोकांचं चर्च असल्यासारखं वाटत आहे. कारण त्यावर क्रॉसचं चिन्ह दिसत आहे. त्या क्रॉसच्या वर एक व्यक्ती भगवा ढेंडा लावत आहे. ज्यावर श्रीरामांचा फोटो आहे. खाली काही लोक जोर जोरानं जय श्री रामाच्या घोषणा देत आहेत.


राम मंदिर उद्घाटनाच्या आदल्या दिवशी प्रकाश राज यांनी शेअर केलेला व्हिडीओ आज व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिलंय, "हे राम... हेच आमच्या देशाचं न्यू नॉर्मल आहे का" याबरोबर प्रकाश राज यांनी #justasking असा हॅशटॅगही शेअर केला आहे.

अभिनेते प्रकाश राज सप्टेंबर महिन्यात चर्चेत आले होते. त्यांनी सनातन धर्मावरून एक विवादात टिप्पणी केली होती. ज्यावरून सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगमुळे प्रकाश चांगलेच अडचणीत आले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.