Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विश्वजित कदम,अमित देशमुख, प्रणिती शिंदेंसह 13 जण काँग्रेस सोडणार ?

विश्वजित कदम,अमित देशमुख, प्रणिती शिंदेंसह 13 जण काँग्रेस सोडणार ?

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी व काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांचे समर्थक काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

त्यानंतर आता चव्हाण यांच्यासोबत पतंगराव कदम यांचे पुत्र आणि सरकारी भूखंडांवर भारती विद्यापीठाचा डोलारा उभा करणारे, गेल्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधींची दिशाभूल करत भाजपाला आतून साथ देत आलेले आमदार विश्वजित कदम त्यानंतर अमित विलासराव देशमुख,माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, अस्लम शेख, सुरेश वरपूडकर आदी 13 बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे. 

याशिवाय, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डी पी सावंत, हनुमंत बेटमोगरेकर, अमीन पटेल, हिरामण खोसकर, सुलभा खोडक, अमित झनक आदी नेतेही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. गत काही महिन्यांपासून आपण काँग्रेसला सोडून कुठेही जाणार नसल्याचा दावा करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी सोमवारी सकाळीच प्रथम आपल्या आमदारकीचा व त्यानंतर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

दुसरीकडे, अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा रंगली आहे. पण अद्याप त्याची पुष्टी झाली नाही. पण असे खरेच झाले तर काँग्रेसला महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वात मोठे खिंडार पडेल हे स्पष्ट आहे. ,विशेषतः नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे, हदगावचे काँग्रेस आमदार माधव जवळगावकर हे सुद्धा अशोस चव्हाण यांच्या समर्थनार्थ आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.