Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परवाना नूतनीकरणासाठी 15 हजाराची लाच घेताना क्लास वन अधिकारी जाळ्यात

परवाना नूतनीकरणासाठी 15 हजाराची लाच घेताना क्लास वन अधिकारी जाळ्यात 

विद्युत कामे करणाऱ्या परवानाधारक कंत्राटदाराकडून परवाना नुतनीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर (५२, रा. पार्वती नगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले. 

तक्रारदार हे परवानाधारक कंत्राटदार असून ते शासकीय विद्युतीकरणाचे कामे घेतात. परवान्याचे नुतनीकरणासाठी त्यांनी खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर याच्याकडे अर्ज केला होता. त्यासाठी सुरळकर याने १५ हजार रुपयांची मागणी केली. 

तक्रारदाराने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझडे, एन. एन. वाघ, सहाय्यक फौजदार दिनेशसिंह पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी या पथकाने सापळा रचून सुरळकर याला तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.  याप्रकरणी गणेश सुरळकर यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.