Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

22 वर्षीय भाच्याचं मामीसोबत होतं अफेअर, केली मामाची हत्या; 6 वर्षाच्या मुलाने केला खुलासा

22 वर्षीय भाच्याचं मामीसोबत होतं अफेअर, केली मामाची हत्या; 6 वर्षाच्या मुलाने केला खुलासा

मध्य प्रदेशच्या इंदुरमधून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे मामीच्या प्रेमात वेड्या झालेल्या भाच्याने मित्रांसोबत मिळून मामाची हत्या केली. पण पोलिसांनी हत्येनंतर 12 तासांच्या आत या ब्लाईंड मर्डरचा खुलासा करत 6 आरोपींना अटक केली.

विदुर नगरमध्ये एक दिवसाआधी पोलिसांना रूपसिंह राठोरचा मृतदेह सापडला होता. चौकशी केल्यावर पोलिसांना आढळलं की, रूपसिंहची हत्या त्याचा 22 वर्षीय भाचा शुभम याने केली. पोलिसांनी भाच्यासोबतच हत्येत सहभागी त्याच्या चार मित्राना आणि मामीलाही अटक केली. या हत्येचा खुलासा मृत व्यक्तीच्या सहा वर्षाच्या मुलाने केला. हत्येमागचं कारण शुभम आणि मृत व्यक्तीची पत्नी पूजा म्हणजे मामी आहे. कारण त्यांच्यात अफेअर सुरू होतं.


अ‍ॅडिशनल डिसीपी अभिनव विश्वकर्मा यांनी माहिती दिली की, मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या भाज्यात अनैतिक संबंध होते. अशात भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्राना सोबत घेऊन मामाची हत्या केली. 12 तासांनंतर घटनेचा खुलासा करत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यात दोन अल्पवयीन आहेत. मामी आणि भाच्याने उशीने तोंड दाबत मामाची हत्या केली होती. नंतर मृतदेह नाल्याच्या बाजूला फेकला होता. जेणेकरून तो अपघात वाटावा.

पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांसोबतच त्याच्या सहा वर्षीय मुलाची चौकशी केली. यादरम्यान शंका आली की, हा अपघात नसून हत्या आहे. पूजाच्या 6 वर्षीय मुलाने सांगितलं की, आई आणि त्याच्या बाबात नेहमीच भांडण होत होतं. त्यानंतर पोलिसांनी पूजाचा मोबाईल चेक केला. यावरून पूजाने शुभमला अनेक व्हिडीओ कॉल केले होते. दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, हत्येनंतर सगळे आपापल्या घरी गेले होते आणि पळून जाण्याचा प्लान होता. पण पोलिसांनी त्यांना पकडलं.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.