महाराष्ट्रात दर दिवशी 34 बाळांचा होतो गर्भातच मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
राज्य सरकारकडून माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. माता आणि बाल माता तसंच बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून विविध स्तरावर उपाय करत असल्याचा दावा केंद्र आणि राज्य शासनाकडून वारंवार केला जातो.
परंतु असं असूनही राज्यामध्ये दिवसाला सरासरी 34 बाळांचा मातेच्या गर्भातच मृत्यू होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठ तासात एक मातामृत्यू होत आहे. माहिती अधिकारामधून ही धक्कादायक माहिती माहितीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तपशिलातून समोर आली आहे.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2023 या काळामध्ये 22 हजार 98 कमी वजनाच्या बाळाचे गर्भातच झालेले मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर 2 हजार 64 मातामृत्यू नोंदवण्यात आले. या आकडेवारीची दिवसाची सरासरी काढल्यास राज्यात सुमारे 34 कमी वजनाच्या बाळाचे मृत्यू तर 3 मातामृत्यू झाले आहेत.
राज्यात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान 13 हजार 635 उपजत मृत्यू तर 1 हजार 217 मातामृत्यू नोंदवण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आणलेत. पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण कार्यालय आकडेवारीला दुजोरा दिला आहे.
कालावधी कालावधी मातामृत्यू
एप्रिल 22 ते मार्च 2023 13,635 1217
एप्रिल 23 ते डिसेंबर 2023 8,463 847
एकूण 22,098 2064
कोट्यवधी खर्च करून बालमृत्यू रोखण्याचे कमी पडत असल्याचं ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. राज्यात दररोज सरासरी 34 बाळे गर्भातच दगावत असल्याची माहिती मिळाली आहे. राज्याची स्थिती यासंदर्भात कशी आहे, ते जाणून घेऊया.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.