Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

पिंपरी : घरबसल्या काम देण्याच्या बहाण्याने टास्क देऊन फसवणूक  केल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर चोरट्यांकडून अनेक अभियंत्यांना गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. यातच आता बॉडी बिल्डर असलेल्या एक जीम ट्रेनरला देखील सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. यू ट्यूबवरील चॅनल सबस्क्राईब करायला सांगून वेगवेगळे टास्क देऊन 42 वर्षीय जीम ट्रेनरची 35 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार वाकड येथे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान घडला आहे. 

याबाबत योगेश माधवराव सोनार (वय-42 रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शांभवी सोनी आणि टेलीग्राम खाते धारक यांच्यावर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी योगेश हे जिम ट्रेनर आहेत. फिटनेस बाबत ते प्रशिक्षण देतात. तसेच बॉडी बिल्डर आहेत.

शांभवी सोनी आणि इतर संशयितांना फोन करुन योगेश यांच्याशी संपर्क साधला. यावेळी कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करात केवळ व्हॉटसअपद्वारे यु ट्यूब अॅपवर सबस्क्राईब करुन टास्क पूर्ण करा. यातून तुम्हाला नफा मिळेल असे फिर्यादी यांना सांगितले. त्यानंतर टेलीग्राम चॅनेल लिंक पाठवून त्यावर टास्कसाठी त्यांची नोंदणी केली. त्यांना वेगवेगळे टास्क देऊन ते खरे असल्याचे भासवले. त्यातून योगेश यांना सरुवातीला फायदा होत असल्याचे भासवले. त्यांच्याकडून टास्कसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडले.

फिर्यादी यांनी 35 लाख 25 हजार 364 रुपये खात्यात भरले. मात्र, फिर्यादी यांना कोणताही नफा किंवा त्यांनी भरलेली रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे करीत आहेत.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.