Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी आमदार नफे सिंह राठी यांच्यावर भरदिवसा 40 गोळ्या झाडून केली हत्या

माजी आमदार नफे सिंह राठी यांच्यावर भरदिवसा 40 गोळ्या झाडून केली हत्या 

नवी दिल्ली : इंडियन नॅशनल लोक दलचे  प्रदेशाध्यक्ष आणि बहादुरगडचे माजी आमदार नफे सिंग राठी यांच्यावर गोळीबार झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राठी यांची हत्या झाली. या घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे. नफे सिंह यांची हत्या कुणी केली, याबाबत पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे.

नफे सिंह राठी यांची गाडी बराही फाटकाजवळून जात असताना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला. या घटनेत राठी यांच्यासह चार जण जखमी झाले. गोळीबारात जखमी झालेले इतर तीन जण राठी यांचे सुरक्षा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर आय-10 वाहनात आले होते. त्यांनी राठी यांच्या वाहनांवर गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा आवाज ऐकून स्थानिक लोक तेथे जमा झाले. या घटनेचे फुटेज समोर आले असून त्यात कारमध्ये चारही बाजूंनी गोळ्या झाडल्या गेल्या आहे. कारला चारही बाजूंनी गोळ्यांचे छिद्र पडले आहेत.

राठींसह सर्व जखमींना ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नाफे सिंग यांच्या मानेवर, कंबरेत आणि मांडीवर अनेक गोळ्या लागल्या होत्या. आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर अन्य दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. झज्जरचे एसपी अर्पित जैन यांनी आपल्या प्राथमिक निवेदनात सांगितले की, "आम्हाला गोळीबाराची माहिती मिळाली आहे. सीआयए आणि एसटीएफ काम करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना झाले आहेत. या हल्ल्यामागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा जवळचा सहकारी कला जाठेदी असल्याचा पोलिसांना संशय आहे.''

माजी आमदार नफे सिंग राठी हे जाटांचे प्रबळ नेते मानले जात होते. 2014 मध्ये, INLD कडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलला, त्यानंतर त्यांनी थोड्या काळासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, भाजपनेही त्यांना तिकीट दिलं नाही, त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 2018 मध्ये ते पुन्हा INLD मध्ये आले. सलग दोन विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. राठी हे दोन वेळा बहादुरगड नगरपरिषदेचे अध्यक्षही होते. नाफे सिंग राठी हे भारतीय कुस्ती संघटनेचे दोन वेळा अध्यक्षही होते. गेल्या आठवड्यात त्याने तुर्कीमध्ये एथनोस्पोर्ट्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

भाजपचे माजी मंत्री मांगे राम राठी यांचा मुलगा जगदीश राठी यांच्या आत्महत्येप्रकरणी नफे सिंग राठी यांना गेल्या वर्षी मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर ते मोठ्या अडचणीत सापडले होते . नफे सिंग राठी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जगदीशच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की, नाफे सिंग त्यांना मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये त्रास देत होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.