Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेरोजगारांचे मंगळवारी उद्योग केंद्रासमोर ढोल बजाव आंदोलन : दीपक चव्हाण

बेरोजगारांचे मंगळवारी उद्योग केंद्रासमोर ढोल बजाव आंदोलन : दीपक चव्हाण 

सांगली: सांगली जिल्ह्यातील बेरोजगारांचे मंगळवारी उद्योग केंद्रासमोर ढोल बजाव आंदोलन होणार आहे. शासकीय उदासीनता आणि बँकाच्या कर्ज नाकारन्याच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होणार आहे. यामध्ये बेरोजगारानी  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बेरोजगार नेते दीपक चव्हाण यांनी केले आहे.
  
सांगली जिल्ह्यात बेरोजगारांच्या प्रश्नांकडे बघायला कोणालाही वेळ नाही. जिल्ह्यात बेरोजगार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामुळे रोजगाराचा प्रश्न आणखीन भीषण होत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज योजना सुरू आहेत मात्र सांगली जिल्ह्यात या धोरणाला हरताळ फासण्याचे काम प्रशासकीय यंत्रणा करीत आहे. सांगली जिल्ह्यात उद्योग केंद्र आणि अन्य महामंडळ यांच्याकडील फक्त 15 टक्केच प्रस्ताव मंजूर झाल्याची गंभीर बाब प्रसिध्दी माध्यमांनी उघडकीस आणली. बँकांच्या नकारात्मक भूमिकेमुळे बेरोजगारांच्या प्रकरणांना नाकारले जात आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीने व्यवसाय उभारण्याचे बेरोजगारांचे स्वप्न हे दिवा स्वप्नच राहिले आहे.

बँकांच्या अनागोंदी कारभारामुळे आणि बेरोजगारांना नाकारल्या जाणाऱ्या कर्जामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. याकडे उद्योग केंद्र आणि संबधित यंत्रणा या फक्त शासकीय प्रोटोकॉल  म्हणून पहात असून याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सांगलीच्या उद्योग केंद्र आणि लीड बँकसमोर समस्त बेरोजगार हे या झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करणार आहेत. यामध्ये बेरोजगार आणि ज्यांची कर्जे बँकेकडून नाकारली आहेत अशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही दीपक चव्हाण यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.