Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसमधील डॅमेज कंट्रोलसाठी थेट शरद पवार मैदानात!

काँग्रेसमधील डॅमेज कंट्रोलसाठी थेट शरद पवार मैदानात!

मुंबई :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल आमदारकीसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर चव्हाण यांनी आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपध्ये प्रवेश कैला.

चव्हाण यांचा भाजप प्रवेश हा महाराष्ट्रात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण कधीकाळी राज्याचं मुख्यमंत्रिपद आणि काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेल्या अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य काही आमदारही भविष्यात पक्ष सोडू शकतात, असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील संभाव्य डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सक्रिय झाले असून आज पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या बड्या नेत्याची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. शरद पवार यांच्या अधिकृत ऐक्स हँडलवरून या बैठकीची माहिती देण्यात आली आहे. "मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सदिच्छा भेंट घेतली," अशी माहिती पवार यांनी दिली आहे.

तसंच या बैठकीला काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम व इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.