पत्नी व जुळ्या मुलांची हत्या करून माजी मेटा इंजिनियरची अमेरिकेत आत्महत्या
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन माटेओ येथे मंगळवारी एका भारतीय कुटुंबाचा त्यांच्या १७ कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. अखेर या घटनेचा उलगडा झाला असून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
आनंद सुजित हेन्री (वय ३७) पत्नी ॲलिस (वय ३८) आणि ४ वर्षांची जुळी मुले नोआ आणि नॅथन यांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या बाबत डेली मेलने वृत्त दिले आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह बेडरूममध्ये, तर नवरा बायकोचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला होता. दाम्पत्याच्या मृतदेहाजवळ एक पिस्तूल सापडले होते. यामुळे खळबळ उडाली होती.
पोलिस या प्रकरणाचा आत्महत्या आणि खून अशा दोन्ही बाजूंनी तपास करत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याच्या रक्ताने माखलेल्या मृतदेहावर ९ एमएम पिस्तुलच्या गोळ्यांच्या खुणा होत्या. लोडेड पिस्तूल बाथरूममध्येच पडले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदने आधी मुलांची हत्या केली आणि नंतर पत्नीवर गोळी झाडून आत्महत्या केली. हे भारतीय-अमेरिकन कुटुंब मूळचे केरळचे रहिवासी होते.
आनंद हा सॉफ्टवेअर इंजिनीअर, गुगल आणि मेटाचा माजी कर्मचारी असल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे. तर त्याची पत्नी झिलो नावाच्या कंपनीत डेटा सायन्स मॅनेजर होती. या दोघांनी २०१६ मध्ये लग्न केले होते. मात्र, त्यांनी कोर्टात घटस्फोटाची अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावर निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, या दोघांनी २०२० मध्ये १७ कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला होता.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जुळ्या मुलांच्या रक्ताच्या नमुन्यात अंमली पदार्थांच्या ओव्हरडोस दिल्याचे आढळले आहे. कारण त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मंगळवारी त्याच्या एका कौटुंबिक मित्राने फोन करून या बाबत मानीती दिली. यानंतर पोलीस आनंदच्या घरी पोहोचले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, आनंद कोणत्याही फोन कॉलला उत्तर देत नव्हता, त्यामुळे त्याच्या मित्राला काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आला.
पोलिस तेथे पोहोचले तेव्हा घराला आतून कुलूप होते. घराच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केल्यावर पोलिसांना जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. मात्र, घराची एक खिडकी उघडी दिसली, ज्यातून पोलिसांना घरात प्रवेश करता आला. घराच्या आत, पोलिसांनी बाथरूममधून जोडप्याचा मृतदेह बाहेर काढला. पोलीस या प्रकरणाचा खून आणि आत्महत्या या कोनातून तपास करत होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.