Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत प्रशांत कदम या गुंडावर धारदार हत्याराने वार खणभाग पानाडे गल्लीतील घटना; प्रकृती चिंताजनक

सांगलीत प्रशांत कदम या गुंडावर धारदार हत्याराने वार खणभाग पानाडे गल्लीतील घटना; प्रकृती चिंताजनक

सांगली, दि. २८ : सांगली शहरातील एका गुंडावर रात्री १० वाजण्याच्या सुमारास खणभागातील बाबर गल्लीत प्रशांत कदम (वय ३६) या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्याराने वार करून खुनी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. प्रशांत हा पानाडे गल्लीच्या कोपऱ्यावर वसला असता त्याच्यावर अज्ञात हल्लोखोरांनी धारदार शस्त्रांनी पोटावर, छातीवर आणि डोक्यावर ७ गंभीर वार केले.

 त्याला तातडीने सांगली सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे दवाखाना सूत्रांनी सांगितले. प्रशांत कदम याच्यावर सांगली आणि पुणे येथे खुनाचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. तो बराच काळ सांगली बाहेर राहत असल्याचीही चर्चा आहे. कदम याच्यावर झालेल्या हल्लामुळे खणभाग पानाडे गल्लीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून सांगली सरकारी दवाखान्यात त्याच्या समर्थकांनी गर्दी केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.