शरद मोहोळनंतर आणखी एका गँगस्टरची हत्या; हल्ल्यात पत्नीही गंभीर जखमी
मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे, आता नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड चिराग लोकेची हत्या करण्यात आली आहे. लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये त्याची पत्नी देखील जखमी झाली आहे. चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेरुळ पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चिराग लोके हा कुख्यात गुंड आहे. त्यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची हत्या करण्यात आली आहे. चार पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. चिराग लोके याचे गवळी व पुण्यातील काही टोळ्यांशी संबंध होते अशी माहिती समोर येत आहे.
पत्नीही जखमी
दरम्यान चिराग लोके याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर या घटनेत त्याची बायको देखील जखमी झाली आहे. लोके याचे पुण्यातील काही टोळ्यांशी संबंध होते अशी माहिती समोर येत आहे. नेरूळ पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.