Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेकायदेशीर खोक्यावर कडक कारवाई, बोर्ड आणि फलक काढले जेसीबीने : उपआयुक्त वैभव साबळे यांची दमदार कामगिरी

बेकायदेशीर खोक्यावर कडक  कारवाई, बोर्ड आणि फलक काढले जेसीबीने : उपआयुक्त वैभव साबळे यांची दमदार कामगिरी 


बेकायदेशीरपणे  बसविलेली  खोकी काढण्याची कारवाई  आज दि १२/२/२०२४   मा आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभाग यांनी सुरू केली आहे. वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोकी हठविलेली नव्हती ,माधवनगर रोड आर टी ओ ऑफिस शेजारील   बेकायदेशीर बसविलेली  ४खोकी  आज जेसीबी च्या साह्याने  काढण्यात आली आहेत . या पुढे ही कारवाई जोमात करण्यात येणार असल्याचे उप आयुक्त श्री वैभव साबळे यांनी या वेळी सांगितले आहे, १५ पेक्ष्या जास्तहरभट रोड   व अन्य रोड  वरील अतिक्रमण करणारे मोठे बोर्ड आणि फलक देखील काढून टाकले आहे,

 तिन्ही शहरातील बेकायदेशीरव खोकी काढण्याची ही मोहीम दि २/२/२०२४ पासून सुरुवात केली आहे , जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापा पेक्ष्या जास्त आहेत ते देखील या पुढे कारवाईसाठी पात्र होणार आहे, ही कारवाई  जो पर्यत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाही तो पर्यत चालू असणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.