राज्यात पंतप्रधान मोदींच्या सभा होऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पु्न्हा उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. सरकारच्या अधिकाऱ्यांनी आज जरांगे पाटलांची भेट घेतली. राज्यात PM मोदींच्या सभा होऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पु्न्हा उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. सरकारच्या अधिकाऱ्यांनी आज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांना करण्यात आली मात्र जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेण्यास नकार देत सरकारला इशारा दिला आहे.
गेल्या महिन्यात 26 जानेवारीला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकारने अधिसूनचा काढून कुणबीतील सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे अश्वासन दिले होते. मात्र याबाबत अजून निर्णय झालेला नाही. यावर भाष्य करताना जरांगेंनी म्हटले की, 'शिंदे, फडवणीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत? सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असाल तर इकडे या.'पुढे बोलताना जरांगेंनी सरकारला इशारा देताना सांगितले की, 'दोन दिवसांत अधिवेशन घेणार होते. घेतलं का? डबल रोल करू नका. मराठे काय आहेत ते तुम्ही 15, 16 तारखेनंतर बघा. आम्ही महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही. आमच्या मागण्या मान्य करा, मी उपोषण कायमचे मागे घेतो.'दरम्यान, मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असल्याने राज्यभरातून पुन्हा एकदा मराठा बांधव आंतरवाली सराटीमध्ये दाखल होऊ लागले आहेत. यापूर्वी देखील जरांगे यांनी याच ठिाकणी उपोषण केले तेव्हा देखील मोठी गर्दी जमली होती. आता पुन्हा एकदा तशीच गर्दी जमण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.