पुण्यात एकाच दिवशी चाकू हल्ल्याच्या दोन घटना; पोटच्या पोरानेच आईवर केले सपासप वार; दुसऱ्या घटनेत दोघांवर भररस्यात हल्ला
पुणे : पुण्यातील गुन्हेगारी काही थांबवायचं नाव घेत नाही आहे. पुण्यात एकाच दिवशी दोन चाकूचे हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहे. दागिण्यासंदर्भात मुलाला विचारल्यामुळे मुलाने आईवर थेट चाकूने हल्ला केला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली आहे तर शिवीगाळ का केली? असं विचारल्यास वडिल आणि मुलाला थेट चाकूने भोसकलं आहे. ही घटना दत्तनगरमध्ये घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे दोन्ही परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
मुलानेच आईवर केला चाकू हल्ला
पहिली घटना ही पुण्यातील थेरगाव परिसरात घडली आहे. आईने आपल्या मुलाला घरातील दागिने कोठे ठेवले, गहाण ठेवले की विकले असे आईने विचारले असता मुलाने थेट चाकूने आईवरच जीवघेणे वार केले आहेत. याप्रकरणी आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मुलगा ओंकार ईश्वर बामणे (वय 19 रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, मुलाला आईने दागिन्याबाबत विचारणा केली. दागिने विकले की गहाण ठेवले, असं आईने मुलाला विचारलं त्यानंतर यासंदर्भात माहिती दे नाहीतर पोलिसांना बोलवेल, अशी आईने मुलाला धमकी दिली. या धमकीचा मुलाला राग आला आणि रागाचाभारात चाकूने जन्मदात्या आईच्या डोक्यावर आणि हातावर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शिवीगाळ का केला? विचारल्याने चाकू हल्ला
दुसऱ्या घटनेत शिवीगाळ का केली? याचा जाब विचारल्यामुळे एकाने थेट बापलेकांवर चाकूने हल्ला केला आहे. टेल्को कॉलनीत हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संग्राम धुळूबा शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी संग्रामला अटक केली आहे. गौरव कुलथे आणि त्याचे वडिल नवनाथ कुलथे या घटनेत चांगलेच जखमी झाले आहेत. अधिक माहितीनुसार तिघेही एकाच परिसरात राहायला आहे आणि एकमेकांना ओळखतात. आरोपी असलेल्या संग्रामने दोन महिन्यांपूर्वी परिसरात दारु पिऊन गोंधळ घातला होता. त्यावेळी नवनाथ कुलथे यांनी आरोपीला समजावून घरी पाठवलं होतं. याचा राग मनात ठेवून तुला आता संपवूनच टाकतो म्हणत वडिल आणि मुलावर हल्ला केला. त्याच्या पोटात सपासप चाकूचे वार केले आणि त्यांना गंभीर जखमी केलं. मुलगा वडिलांना वाचवण्यासाठी गेला असता त्याच्याही पोटात चाकू खुपसला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.