Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गर्भवती महिलांना सरकारी नोकरीपासून वंचित ठेवता येणार नाही', उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गर्भवती महिलांना सरकारी नोकरीपासून वंचित ठेवता येणार नाही',  उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गर्भवती महिलांना सरकारी नोकरीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिला आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाने गर्भवती महिलांना सरकारी नोकरीसाठी योग्य मानण्यापासून रोखणारा नियम रद्द केला.

आई बनणे हे एक मोठे वरदान आहे आणि त्यामुळे महिलांना रोजगारापासून वंचित ठेवता येणार नाही, यावर हायकोर्टाने भर दिला आहे. गरोदरपणामुळे नैनितालच्या बी.डी. पांडे रूग्णालयातून काढून टाकलेल्या मीशा उपाध्याय यांच्या याचिकेवरील सुनावणीत हायकोर्टाने हा महत्त्वपुर्ण निर्णय दिला आहे. पांडे यांना हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ऑफिसरचे पद नाकारण्यात आले होते.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, डीजी मेडिकल हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअरने मिशा यांना नियुक्ती पत्र जारी केले असूनही, हॉस्पिटलने तिला फिजिकल फिटनेस सर्टिफिकेटचा हवाला देऊन नोकरीमध्ये रुजू होण्यास नकार दिला होता. ज्यामध्ये ती या पदासाठी अयोग्य असल्याचे नमूद केले होते. गरोदर असण्याशिवाय इतर कोणतीही आरोग्य समस्या नसतानाही व्यवस्थापनाला त्यांना भारत सरकारच्या गॅझेटियर नियमांतर्गत सामील होण्यासाठी तात्पुरते अपात्र ठरले होते.

न्यायमूर्ती पंकज पुरोहित यांच्या एकल न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शुक्रवारी रुग्णालयाला निर्देश दिले की, "१३ आठवड्यांची गरोदर असलेल्या याचिकाकर्त्याला नर्सिंग ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाईल याची तात्काळ खात्री करा." उत्तराखंड उच्च न्यायालयाने गर्भवती महिलांना सरकारी नोकरीसाठी योग्य मानण्यापासून रोखणारा नियम रद्द केला. मातृत्व हे निसर्गाचे वरदान आणि आशीर्वाद आहे, त्यामुळे महिलांना रोजगारापासून वंचित ठेवता येणार नाही, असे उत्तराखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाचा हा निर्णय मीशा उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या उत्तरात आला आहे.

या नियमाबाबत भारतीय राजपत्रात नोंदवलेल्या (असाधारण) नियमांवरही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यामध्ये 12 आठवड्यांपेक्षा जास्त गर्भधारणा असलेल्या महिलांना 'तात्पुरते अपात्र' म्हणून लेबल करण्यात आले आहे. यावर भर देत न्यायालयाने म्हटले की, 'केवळ या कारणामुळे महिलेला नोकरी नाकारता येणार नाही; राज्याने सांगितल्याप्रमाणे या कडक नियमामुळे या कामाला आणखी विलंब करता येणार नाही. हे निश्चितपणे कलम 14, 16 आणि 21 चे उल्लंघन आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.