येरवडा जेलमध्ये कैद्यानी अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली
पुणे : येरवडा कारागृहातील कैद्यांनी अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे. पठाण असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत संबंधित अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. कारागृह आधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
ही घट्ना आज सकाळी येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक १ मध्ये घडली. विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे हे दोघे ही सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत्. या दोघांनी आज किरकोळ कारणावरून १० इतर गुंडाना घेऊन शेरखान पठाण यांना मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेत पठाण यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली तर उजवा हाथ फॅक्चर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्या कैद्यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.