Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुर्देवी..! लग्नाचे विधी सुरू असतानाच नववधूचा मंडपातच मृत्यू

दुर्देवी..! लग्नाचे विधी सुरू असतानाच नववधूचा मंडपातच मृत्यू

पंजाब राज्यातील फिरोजपूर जिल्ह्यात एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे लग्न मंडपातच नववधूचा मृत्यू झाला. यानंतर वऱ्हाडी मंडळींमध्ये आक्रोश पाहायला मिळाला. नववधू-वराने सप्तपदी पूर्ण केले होते व वधू स्टेजवर बसली होती. यावेळी अचानक तिची तब्येत बिघडली व १० मिनिटातच तिचा जागीच मृत्यू झाला.

नववधू बेशुद्ध झाल्याचे समजताच लग्नमंडपात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सर्वांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लग्नाच्या आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात बदलले. सांगितले जात आहे की, कमी रक्तदाबामुळे नववधूचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजपूर जिल्ह्यातील गुरहरसहाय तालुक्यातील स्वाह वाला गावात जय चंद यांच्या २३ वर्षीय मुलगी नीलमचे लग्न होते. नीलमचे लग्न रुकना बस्ती येथील महेंद्र कुमार थिंद यांचा मुलगा गुरप्रीत याच्याशी ठरले होते. दोघांचे मोठ्या उत्साहात विवाह केला जात होता. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. वधू-वराची सप्तपदीही झाली होती. यानंतर लोक नृत्यू करत होते. त्याचबरोबर नवदाम्पत्याला भेटवस्तू दिल्या जात होत्या. यावेळी अचानक वधूचे ब्लड प्रेशर कमी झाले व ती स्टेजवरच बेशुद्ध होऊन पडली. यानंतर सर्वत्र खळबळ माजली. लोकांनी तरुणीच्या चेहऱ्यावर पाणी मारले मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी गावातील डॉक्टरला बोलावले. त्यांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

नववधूचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याचे पाहून नवरदेवही बेशुद्ध झाला. नवरदेव मुलालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वधूच्या मृत्यूनंतर आनंदाने भरलेल्या घरावर क्षणात शोककळा आली. वऱ्हाडी मंडळीना दु:खी अंतकरणाने परतावे लागले. मुलीच्या नातेवाईकांना मुलीची सासरी पाठवणी करण्याऐवजी तिची अंत्ययात्रा काढावी लागली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.