सांगलीत बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार, विजेत्याला 'वनबीएचके प्लॅट मिळणार
महाराष्ट्रात आतापर्यंत बैलगाडा शर्यतीसाठी बुलेट, जेसीबी व थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत. परंतु, पहिल्यांदाच कासेगाव येथे माजीमंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी भव्य "जयंत केसरी"बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. येथे पहिल्या क्रमांकाच्या बैलगाडी शर्यत विजेत्याला वन - बीएचके प्लॅट बक्षीस रूपाने दिले जाणार आहे, अशी माहिती संयोजक अतुल लाहीगडे यांनी दिली.
कासेगाव ता.वाळवा येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गा लगत असणाऱ्या एका हॉटेलच्या पाठीमागील जवळपास ७० एकर शेत जमिनीवर मैदान तयार करण्यात आलेले आहे. स्पर्धेचे सर्व निकाल हे ड्रोन व स्क्रीन च्या साह्यानेच देण्यात येणार आहेत.या स्पर्धा शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी ही उभारण्यात आलेली आहे.
अशी आहेत इतर रोख बक्षीसे
द्वितीय क्र.६ लाख ६ हजार २६५/- तृतीय क्र.३ लाख ६ हजार २६५/-चतुर्थ क्र.२ लाख ६ हजार २६५/-पाचवा क्र.१ लाख ६ हजार २६५/- सहावे व सातवा क्र. प्रत्येकी ६२ हजार २६५/- रोख रक्कम व कायमशिल्ड देण्यात येणार आहे. तसेच सेमी फायनल मधील २ क्रमांकाच्या सर्व स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक अतुल लाहीगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास लाहीगडे, मकरंद माने, विक्रम गावडे, सोमनाथ लाहीगडे, अक्षय लाहीगडे, अभिषेक दंडवते आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.