दहावी - बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार स्थगित..महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांची माहिती...
सांगली दि.२१ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या बोर्ड परीक्षेवरील बहिष्कार महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने स्थगित केल्याचे महामंडळ सरकार्यवाह रविंद्र फडणवीस नागपूर यांनी सांगितल्याची माहिती आज कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली आहे. खासगी शिक्षण संस्थांच्या समस्या सुटण्यासाठी बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतला होता. तशी नोटीसही शासनास दिली होती. दि. १२ फेब्रुवारी रोजी ना. दिपक केसरकर यांनी महामंडळ शिष्टमंडळ व शिक्षण व अर्थ खात्यातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत खासगी शिक्षण संस्थांचे प्रश्न सुटावेत यासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लवकरच बैठक आयोजित केली जाईल.
मार्च २०२४ पूर्वी वेतनेतर अनुदान दिले जाईल.महामंडळ शिष्टमंडळाबरोबर शिक्षण खात्याची दर तिमाही बैठक आयोजित केली जाईल.शिक्षकेतर भरतीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येतील असे निर्णय शिक्षण मंत्र्यांनी दिले. हे निर्णय लेखी स्वरूपात काढण्यात येतील असे सांगण्यात आले. तोपर्यंत परीक्षेवरील बहिष्कार तूर्त स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती महामंडळ सरकार्यवाह रविंद्र फडणवीस यांनी दिल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले आहे. शिक्षणमंत्र्याबरोबर बैठकीत महामंडळ पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.