नववीतील विद्यार्थिनिवर सामूहिक बलात्कार! तीन जणांना अटक अटक
दिल्लीतील उत्तर द्वारका भागात राहणाऱ्या व इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेवर तब्बल १० महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू होता. अखेर हा त्रास सहन न झाल्याने पीडित म विद्यार्थिनीने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील द्वारका उत्तर भागात सुमारे १० महिन्यांपासून या पीडित विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार सुरू होता. या त्रासाला कंटाळल्याने फिनाईल पिऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. द्वारका उत्तर येथील रहिवासी असलेली पीडित तरुणी ही येथील एका शाळेत शिक्षण घेते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये शाळा सुटल्यावर ती घरी जात असतांना शाळेबाहेरील आवारात आरोपी महेंद्र हा तरुण त्याच्या मित्रांसोबत उभा होता.
दरम्यान, महेंद्रने पीडितेची छेड काढत तिला त्याच्या सोबत येण्यास सांगितले. दरम्यान, तिने याला नकार दिल्याने त्याने पीडिटेच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडित तरुणी घाबरली आणि आरोपींनी तिला कारमध्ये विपिन गार्डनमधील फ्लॅटवर नेट तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच तिला तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन सोडून दिले. या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरली आणि अनेक दिवस शाळेत गेली नाही. आरोपी आणि त्याचे मित्र पीडितेच्या घराजवळ राहत असल्याने त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. जुलैमध्ये जेव्हा ती शाळेत गेली तेव्हा त्यांनी पुन्हा तिचे अपहरण करून तिला फ्लॅटवर नेत तिच्यावर पुन्हा सामूहिक बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवला.
फोन करून आली नाही तर व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी आरोपींनी तिला दिली. एक महिन्यानंतर, आरोपी पुन्हा पीडितेच्या शाळेत गेले. यावेळी पीडिता गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिला बळजबरीने गर्भनिरोधक औषध पाजले. औषध घेतल्यानंतर तिची प्रकृती खालावली. यानंतर ती दहशतीत होती. दरम्यान, पीडित मुलगी शाळेत गेल्यावर आरोपी अनेकदा तेथे येऊन तिला त्रास देत असे.
आईची थायरॉईडची सर्व औषधे घेतली
मुलगी ही काळजीत दिसत असल्याने कुटुंबीयांनी विचारणा केल्यानंतरही विद्यार्थ्याने काहीही सांगितले नाही. दरम्यान, २५ जानेवारी रोजी तिने आईचे थायरॉईडचे सर्व औषध सेवन केल्याने तिची प्रकृती खालावली. यामुळे तिच्या आईने तिला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. तीन दिवसांनी २८ जानेवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पीडित मुलगी घरी आली. १ फेब्रुवारी रोजीला ती घरी आल्यावर तिने पुन्हा फिनाईल पीत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी तिच्या आईने वेळीच पाहिले असता, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आईने विचारणा केली असता पीडितेने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांत जात तक्रार देण्यात आली असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.