हेल्मेट नाही म्हणून पकडलं, मात्र तो वाहतूक पोलिसांनाच चावला; Video
नवी दिल्ली : रस्त्यानं वाहन चालवताना अनेक नियम आहेत जे पाळले नाही तर ट्रॅफिक पोलीस पकडतात. हेल्मेट नाही घातलं किंवा सिग्नल तोडला तर ट्रॅफिक पोलीस लगेच बाजूला घेतात. अशा घटना दिवसभरातून अनेक वेळा घडत असतात. असाच एक प्रकार समोर आलाय मात्र यावेळी पकडलेल्या तरुणानं पोलिसांनाच दम दाटी करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. बंगळुरुमधून ही घटना समोर आलीय. ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं म्हणून रागात तरुणानं पोलिसाचा हातच चावला. त्यांच्याशी वाद घालत गाडी घेऊन जात होता. मात्र तरुणाच्या या उद्धट वागणूकीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सय्यद रफी याला विल्सन गार्डन 10व्या क्रॉसजवळ हेल्मेटशिवाय स्कूटर चालवताना पोलिसांनी पकडलं. हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याबद्दल रफीला थांबवलं मात्र त्याला राग अनावर झाला. तो पोलिसाशी हुज्जत घालू लागला आणि त्यानं एका पोलिसाचा हातही चावला. तरुणाच्या या कृत्यावर पोलिसांनी त्याला अटक केलं.
दरम्यान, बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त दंडाची थकबाकी असलेल्या वाहनधारकांच्या घरी नोटीस पाठवण्यात येणार आहेत. @rakeshprakash1 यांनी X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर येताच काही वेळातच व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून तरुणाच्या या कृत्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.